
वैभववाडी : ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरलेले वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद करण्यात आले आहे. शासनाकडून संबंधित कंपनीला निधी उपलब्ध न झाल्याने कंपनीने ही सेवा थांबविल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नियमित डायलिसिससाठी अवलंबून असलेल्या रुग्णांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, आता उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागणार आहे.
मागील वर्षी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले होते. या सुविधेमुळे तालुक्यातील तसेच परिसरातील मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. दरमहा सरासरी ३० ते ३५ रुग्ण या केंद्रात उपचार घेत होते. विशेष म्हणजे, वारंवार दूरच्या शहरांमध्ये जाण्याचा त्रास आणि प्रवासाचा खर्चही यामुळे वाचत होता.
मात्र, शासनाकडून सेवा पुरविणाऱ्या कंपनीला निधी मिळत नसल्याने अखेर हे सेंटर बंद पडले आहे. त्यामुळे नियमित डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे. खासगी रुग्णालयात डायलिसिसचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबांवर अतिरिक्त भार पडणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








