
दोडामार्ग : महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची स्वच्छता व आरोग्य जोपासण्याच्या उद्देशाने कसई-नगरपंचायतीच्या मार्फत लक्ष्मी सीताराम हळबे कॉलेजमध्ये सॅनिटरी पॅड व सॅनिटरी डिस्पोजल मशीन भेट देण्यात आली.
सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशीनचे महत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी ही दोन्ही यंत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचे महत्त्व (Sanitary Napkin Vending Machine) तात्काळ उपलब्धता या मशीनमुळे विद्यार्थिनींना किंवा महिलांना कोणत्याही आपत्कालीन किंवा गरजेच्या वेळी अगदी सहज आणि कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध होते.
संकोच दूर होतो अनेकदा विद्यार्थिनी उघडपणे सांगण्यास संकोच करतात, अशा वेळी या स्वयंचलित मशीनमधून पॅड मिळणे सोयीचे आणि गोपनीयता राखणारे ठरते. शाळा-महाविद्यालयांमधील सातत्य मासिक पाळीच्या काळात योग्य सुविधा नसल्यामुळे अनेकदा विद्यार्थिनी शाळा किंवा कॉलेजला दांडी मारतात. या मशीनमुळे गहाळ होणारे वर्ग आणि शिक्षणातील खंड टाळता येतो.
सॅनिटरी डिस्पोजल मशीनचे महत्त्व (Sanitary Disposal Machine) आरोग्य व स्वच्छता (Hygiene) वापरलेले नॅपकिन सुरक्षितपणे आणि विनाअडथळा नष्ट करण्यासाठी हे मशीन अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे अस्वच्छतेमुळे होणारे जंतू संसर्ग (Infections) आणि आजार टाळता येतात.
पर्यावरणपूरक विल्हेवाट उघड्यावर किंवा चुकीच्या पद्धतीने नॅपकिन टाकल्यामुळे पर्यावरणाला आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. हे मशीन कचऱ्याची विल्हेवाट सुरक्षित पद्धतीने करते. शौचालयांची स्वच्छता चुकीच्या पद्धतीने कचरा टाकल्यामुळे होणारे ड्रेनेज चोकअप किंवा दुर्गंधी या समस्या टळतात, ज्यामुळे सार्वजनिक शौचालये स्वच्छ राहतात.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण असून, शिक्षण वर्गाकडून नगरपंचायतीच्या या जनहिताच्या निर्णयाचे मोठे स्वागत होत आहे. संजना म्हावळणकर (आरोग्य सभापती), संध्या प्रसादी (नगरसेविका), स्वराली गवस (नगरसेविका) मार्फत फीत कापून मशीनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच संध्या प्रसादी मार्फत माशिनीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या विशेष कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीपक गवस (जिल्हा परिषद सदस्य), चेतन चव्हाण (नगराध्यक्ष), संकेत गायकवाड (मुख्याधिकारी), स्वप्नील गवस यांच्यासह कर निरीक्षक तथा प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत पिळणकर, स्वच्छता निरीक्षक निवेद कांबळी, लिपिक संजय शिरोडकर, लिपिक सुरेखा ताटे, शहर समन्वयक सिद्धेश शेगले आणि नगरपंचायत कर्मचारी सूर्यनारायण गवस, प्रणाली शेतकर तसेच कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान जाधव, प्रा. श्रुती पडवळ, प्रा. सेफाली गवस, डॉ. रामकिसन मोरे इतर प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कसई-नगरपंचायतीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले असून, हा उपक्रम इतर शैक्षणिक संस्थांसाठीही एक आदर्श पायंडा पाडणारा ठरत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेज प्रशासनाकडून नगरपंचायतीचे विशेष आभार मानण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








