
सावंतवाडी : तिरोडा येथील जय माऊली युवा मित्रमंडळाच्या वतीने रविवार २९ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिरोडा येथे होणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून १०० रक्तदात्यांचे रक्तदान घडवून आणण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी परिसरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जय माऊली युवा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराला मंगला प्रभू खानोलकर फाऊंडेशन यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








