
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील मशिनरी सतत नादुरुस्त होत असल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. याची दखल घेऊन रुग्ण कल्याण समितीचे आमदार प्रतिनिधी व विद्यमान नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी हा विषय समितीच्या बैठकीत उचलून धरला होता.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जमा झालेल्या निधीतून नूतन शव-कूलिंग पेटी मंजूर करून घेण्यात आली. यासाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक हृदयरोग तज्ञ डॉ. विशाल रेड्डी यांनी सहकार्य केले. त्यामुळे सावंतवाडीतील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. या नूतन शव-कूलिंग पेटीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी ही पेटी अत्यंत आवश्यक असते. यामुळे मोठी गैरसोय दुर होणार आहे. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, आनंदराव गायकवाड,वैद्यकीय अधिकारी रुपाली हेळेकर, परिचारीका वैष्णवी गोसावी, सुप्रिया नाईक, मानसी गावडे, श्रीकृष्ण सावंत, नमिता इंगळे, महेश बावकर, वामन पालव उपस्थित होते. तसेच रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








