
सिंधुदुर्ग : त्रिमूर्ती हायस्कूल, शिरवंडे (ता. मालवण) येथील मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन रामचंद्र तर्फे यांच्या आई सीताबाई रामचंद्र तर्फे (रा. जांभवडे) यांचे मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने कणकवली येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तर्फे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सीताबाई तर्फे या वृद्धापकाळामुळे काही काळापासून अशक्त होत्या. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी जांभवडे येथे मंगळवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
वामन तर्फे सर हे शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी समजताच शैक्षणिक, सामाजिक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, सहकारी आणि नातेवाईकांनी तर्फे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सीताबाई रामचंद्र तर्फे यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि तर्फे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी भावना विविध शिक्षक आणी शिक्षकेत्तर संघटनानी व्यक्त केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








