
नवी दिल्ली : बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी 20 नोव्हेंबरला अनेक चित्रपट रिलिज होणार आहेत. यामध्ये कॉमेडी, हॉरर, ऍक्शन, रोमान्स आमि थ्रिलर सारख्या विविध चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमधील चित्रपटांचा समावेश आहे.
प्रताप (Pratap)
२० नोव्हेंबर रोजी अमित साधचा 'प्रताप' हा चित्रपट रिलिज होत आहे. सचिन सराफ दिग्दर्शित हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याची कथा मांडली आहे. याचे आयुष्य एका व्हायरल व्हिडिओमुळे पूर्णपणे बदलून जाते. अमित साध यात 'प्रताप रानडे' नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात ईशा देओल, सीमा बिस्वास, तिग्मांशू धुलिया आणि मिलिंद गुणाजी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
सत्यवान सावित्री (Sathyavan Savithiri)
कीर्ती सुरेशचा 'सत्यवान सावित्री' हा चित्रपटही २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलिज होणार आहे. मिस्किन दिग्दर्शित या चित्रपटात कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. हा एक थ्रिलर-ड्रामा चित्रपट असून तो तमिळ आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांत प्रदर्शित केला जाईल.
काली खेती (Kaali Kheti)
जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांची मुख्य भूमिका असलेला 'काली खेती' हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी रिलिज होत आहे. मूळतः 'खेती' असे शीर्षक असलेला हा चित्रपट आधी ऑक्टोबरमध्ये रिलिज होणार होता. हा एक सायकॉलॉजिकल, सुपरनॅचरल हॉरर चित्रपट आहे. यात जॅकी श्रॉफ एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत, तर शरद केळकर त्यांच्या मुलाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात नेहा सरगम, वीरेंद्र सक्सेना आणि शाजी चौधरी हे कलाकारही आहेत.
ओ.एम: ऑपरेशन मोल (O.M: Operation Mole)
धनुषचा 'ओ.एम: ऑपरेशन मोल' हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलिज होणार आहे. राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. धनुषसोबतच यात ममूटी, साई पल्लवी, श्रीलीला आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पार्टी ॲनिमल्स (Party Animals)
रवी छाब्रिया दिग्दर्शित 'पार्टी ॲनिमल्स' हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. अली हाजी यांनी लिहिलेला हा एक विनोदी चित्रपट असून यात मैत्री, धम्माल-मस्ती आणि गोंधळात टाकणाऱ्या मजेशीर प्रसंगांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
आकासमलो ओका तारा (Aakasamlo Oka Tara)
दुलकर सलमानचा 'आकासमलो ओका तारा' हा चित्रपटही २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलिज होणार आहे. पवन सादिनेनी दिग्दर्शित हा एक रोमँटिक ड्रामा आहे. यात दुलकर सलमानसोबत श्रुती हासन, केशव दीपक, रुहानी शर्मा आणि सात्विका वीरवल्ली यांच्या मुख्य भूमिका आहेत. सुमारे २ तास ४० मिनिटांचा हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित होईल. ज्यांना रोमँटिक चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








