LIVE UPDATES

जुनी पेन्शनसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

बैठकीसाठी वेळ देण्याचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 01:39 PM
views 14  views

सिंधुदुर्ग : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच अनुदान टप्पावाढ, त्रुटी पूर्तता, शेवटच्या वर्गाची पटसंख्या आणि पद दुरुस्ती यांसह शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी शिक्षक आमदारांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.

या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री पंकज भोयर यांच्यासोबत बैठक आयोजित करून द्यावी, या मागणीसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार कौस्तुभ गावडे, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर आणि अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी त्यांची काल भेट घेतली.

यावेळी बैठकीची तारीख निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन समितीच्या पत्रावर वेळ देण्यासंदर्भात आपल्या सहाय्यकांकडे रिमार्क देऊन आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, आज होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा, यासाठी उपसचिव उत्तम कांबळे यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी जुनी पेन्शन संघटनेचे सचिन नलावडे, दत्ता पाटील यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानात सिंधुदुर्ग अग्रेसर राहील
November 18, 2026
कुडाळ शहर परिसरातील महामार्गावरील स्ट्रीट लाईट्स गणेश चतुर्थीपासून बंद
November 18, 2026
दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026
मुख्याध्यापक वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
Maharashtra subordinate court employees announcing an indefinite strike over salary demands
Maharashtra Court Employees Strike : समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
November 16, 2026
bharat parva : भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’
November 16, 2026
Uday Samant addresses Mahendra Dalvi's remarks against Sunil Tatkare
महायुतीमध्ये असताना एकमेकांवर टीका नको : उदय सामंत
November 16, 2026