
सावंतवाडी : वृद्ध, आजारी तसेच अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची घरच्या घरी काळजी घेण्यासाठी सावंतवाडी येथील केअरीजम् होम हेल्थ केअर या संस्थेच्या माध्यमातून रुग्णसेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यात ही सेवा पुरविण्यात येत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात घरातील रुग्णांची २४ तास काळजी घेणे कुटुंबीयांसाठी आव्हानात्मक ठरते. ही गरज लक्षात घेऊन केअरीजम् होम हेल्थ केअरच्या वतीने रुग्णाच्या राहत्या घरी २४ तास निवासी रुग्णसेवक उपलब्ध करून दिले जात आहेत.
या सेवेमध्ये वृद्ध, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची दैनंदिन काळजी घेण्यासह रुग्णाशी संबंधित आवश्यक कामांचा समावेश आहे. यासाठी प्रशिक्षित व विश्वासू रुग्णसेवकांची नियुक्ती केली जाते. तसेच उत्तम व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून रुग्णसेवा देण्यावर संस्थेचा भर आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय सावंतवाडीत भटवाडी, लक्ष्मी नगर, एनएबी हॉस्पिटलसमोर येथे आहे.
घरातील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती किंवा विशेष देखभालीची गरज असलेल्या रुग्णांसाठी ही सेवा उपयुक्त ठरू शकते. अधिक माहितीसाठी आणि रुग्णसेवा उपलब्ध करून घेण्यासाठी 9120120191 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








