
सावंतवाडी : विठ्ठल मंदिरात कार्तिकी महा एकादशी सोहळा शनिवार २१ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. त्यानिमित्त पहाटे साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.
सकाळी सहा वाजता श्री विठ्ठल रखुमाई काकड आरती व महापूजा होणार आहे. महापूजा श्री. व सौ. हनुमंत बाबाजी सावंत माजगाव यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत निलेश मेस्त्री यांच्या सद्गुरु संगीत विद्यालयाचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत स्थानिक भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ह.भ.प श्री. स्नेहलदीप सामंत यांचे कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर रात्री नऊ वाजता श्रींची पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तसेच दररोज सायंकाळी सहा वाजता कीर्तन आणि रात्री आठ वाजता श्रींची पालखी सेवा होणार आहे. हा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठ्ठल मंदिर स्थानिक उपसमिती यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








