LIVE UPDATES

Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 06:04 PM
views 17  views
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.

सिंधुदुर्ग : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व जिजाऊ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या "संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वह्या वाटपाचा संकल्प" या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आज दोडामार्ग तालुक्यातील ७ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. जिजाऊ संघटना, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 माध्यमिक विद्यालय, झोळंबे, समाजसेवा हायस्कूल, कोलझर,नूतन विद्यालय, कळणे, सरस्वती विद्यामंदिर, कुडासे,माध्यमिक विद्यालय, झरेबांबर, बापूसाहेब देसाई विद्यालय, उसप, श्री शांतादुर्गा एम. व्ही. पिकुले विद्यालय आदी ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.

झोळंबे येथून या उपक्रमाचा शुभारंभ झाला तर पिकुळे विद्यालयात त्याचा समारोप झाला. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वह्या प्रदान करण्यात आल्या. हातात नव्या कोऱ्या वह्या पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मदत मोलाची ठरत असल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली. शिक्षक व ग्रामस्थांनीही जिजाऊ संस्थेच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या कार्यक्रमांना जिजाऊ संघटनेचे सुदर्शन पाटील, वैभव मसणे, ओमकार तिवरेकर, ज्ञानेश्वर नेवरेकर यांच्यासह कोलझरचे सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले, झोळंबेचे उपसरपंच विनायक गाडगीळ, प्रकाश गवस, दिलखुश देसाई, अप्पा देसाई, समीर गवस, सुजल गवस, विष्णू नार्वेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांचे संस्थापक निलेश सांबरे म्हणाले, कोकणातील प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत स्वप्न आहे, पण त्या स्वप्नांच्या वाटेत अनेकदा परिस्थितीची अडचण उभी राहते. एकही विद्यार्थी केवळ वहीअभावी मागे राहता कामा नये, हीच जिजाऊची ठाम भूमिका आहे. आजचा विद्यार्थी हाच उद्याचा अधिकारी, उद्याचा नेता आणि उद्याच्या कोकणचा शिल्पकार आहे. कोकणातील मुलांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिद्द आणि कष्टाने ती पूर्ण करावीत आणि अधिकारी बनून आपल्या मातीचे नाव उज्ज्वल करावे, हेच जिजाऊचे ध्येय आहे. स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी जिजाऊ संस्था ठामपणे, कायम उभी राहील, हा माझा शब्द आहे अशी भावना व्यक्त केली. 

दरम्यान, संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वह्या वाटप" या संकल्पाचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून तब्बल ५ लाख वह्यांचे वाटप पुढील १५ दिवसात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविला जाणार असून, त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती जिजाऊ संघटनेचे सुदर्शन पाटील यांनी दिली.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी स्थानकांवर वातानुकूलित कक्षांचे उद्या लोकार्पण
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी स्थानकांवर वातानुकूलित कक्षांचे उद्या लोकार्पण
November 19, 2026
International Men's Day Celebration Kudal
International Men's Day : बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत जागतिक पुरुष दिन साजरा
November 19, 2026