
नवी मुंबई : टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूड वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या रडारवर मूळचा अभिनेता टायगर श्रॉफ नव्हता, तर इंडस्ट्रीतील एक बडा अभिनेता मुख्य लक्ष्यावर होता. मात्र, तो प्लॅन फसला आणि त्यानंतर हल्लेखोरांनी टायगर श्रॉफवर भररस्त्यात गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.
या संपूर्ण घटनेनंतर आणि वाढत्या सुरक्षेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, आधीच कडेकोट सुरक्षेत असणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत आणखी मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याच्या संरक्षणासाठी आता मुंबई पोलिसांसह विशेष कमांडोजचा ताफा तैनात करण्यात आला असून, सुरक्षेतील जवानांना एमपी५ एसडी६ (MP5SD6) या अत्यंत आधुनिक आणि इम्पोर्टेड सबमशीन गनने सज्ज करण्यात आले आहे. ही विशेष गन ९ बाय १९ एमएम पॅराबेलम कॅलिपर गोळ्यांसाठी बनवली असून, यात असलेल्या इंटिग्रेटेड सप्रेसरमुळे फायरिंगचा आवाज आणि फ्लॅश कमी होण्यास मदत होते. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








