LIVE UPDATES

‘रामायण’च्या भव्य पडद्यावर झळकले सावंतवाडीच्या सुपुत्राचे नाव

बी. एस. बांदेकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी : ऍनिमेशन, व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स क्षेत्रात उल्लेखनीय योगदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 04:54 PM
views 2032  views
Sahadev Gaonkar from Sawantwadi, an alumnus of B.S. Bandekar College of Fine Art, who contributed to the Ramayana movie's Animation and VFX team.

सावंतवाडी : सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘रामायण’ या भव्य 2D–3D चित्रपटाच्या निर्मितीत सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सहदेव गावकर याने ऍनिमेशन, व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्स टीमचा महत्त्वाचा सदस्य म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्याचे नाव या भव्य चित्रपटाच्या निर्मितीशी जोडले गेल्याने सावंतवाडी तसेच महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भव्य चित्रपट पडद्यावर साकारताना केवळ कलाकार आणि कॅमेऱ्यामागील तंत्रज्ञच नव्हे, तर पडद्यामागे काम करणाऱ्या असंख्य कलाकार व तंत्रज्ञांची मेहनत महत्त्वाची असते. सातत्याने असणाऱ्या डेडलाईन्स, कामाचा प्रचंड ताण, प्रत्येक फ्रेम परिपूर्ण करण्याची धडपड आणि आपल्या कामाविषयीची आत्मीयता या सगळ्यातून मार्गक्रमण करत सहदेवने आपल्या कलेची आणि कौशल्याची प्रभावी छाप या चित्रपटाच्या निर्मितीत उमटवली आहे.

चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात अनेक आव्हानांना सामोरे जाताना आपल्या कामाचे अंतिम रूप मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता प्रत्येक कलाकाराच्या मनात असते. आणि अखेर चित्रपटाच्या पडद्यावर स्वतःचे नाव झळकताना मिळणारा आनंद हा त्या संपूर्ण मेहनतीची खरी पोचपावती ठरतो. सहदेवसाठीही हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक समाधानाचा ठरला आहे.

सहदेवच्या या यशामुळे त्याचे आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच त्याचे गाव सावंतवाडी यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. त्याचबरोबर त्याने शिक्षण घेतलेल्या B. S. Bandekar College of Fine Artच्या लौकिकातही भर पडली आहे.

महाविद्यालयीन शिक्षणातून मिळालेल्या कलात्मक जाणिवा, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या बळावर सहदेवने मनोरंजन विश्वातील अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याची ही यशस्वी वाटचाल महाविद्यालयातील सध्याच्या तसेच भावी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

सहदेव गावकर याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रशासन, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील कलात्मक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

“सहदेवच्या कलेला आणि मेहनतीला अशीच नवनवीन क्षितिजे मिळोत आणि त्याची यशस्वी वाटचाल उत्तरोत्तर अधिक दमदार होत राहो,” अशा शब्दांत महाविद्यालय परिवाराने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.


ताजी बातमी

View all

Kokansad Diwali magazine 2026 praised by renowned Marathi literary figure Gurudas Pandurkar for its cultural and literary value.
Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज
November 14, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026
वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
November 14, 2026
दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला
November 14, 2026
संबंधित बातम्या

View all

Singer Dhvani Bhanushali shares romantic engagement and proposal pictures with Yash Bhanushali, showing her diamond ring.
'वास्ते' फेम ध्वनी भानुशालीने शेअर केले साखरपुड्याचे फोटो; कोण आहे तिचा होणारा जोडीदार? वाचा सविस्तर
November 14, 2026
 Viral deleted scene from Ramayana movie showing Lord Ram rescuing Sita and Lakshman from wild animals.
Ramayana Deleted Scene : 'रामायण'मधील डिलीट केलेला तो थरारक सीन...
November 13, 2026
Amitabh Bachchan returns to the sets of Kaun Banega Crorepati 18 after recovering from seasonal flu.
KBC 18 Season : 'कौन बनेगा करोडपती १८'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा दमदार कमबॅक
November 13, 2026
New OTT movies and web series releasing on Netflix, JioHotstar, ZEE5 and Apple TV on November 13, 2026
शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका! रिलिज होणार 'हे' चित्रपट अन् वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी
November 12, 2026