LIVE UPDATES

KBC 18 Season : 'कौन बनेगा करोडपती १८'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा दमदार कमबॅक

KBC Latest Promo : नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन सेटवर पोहोचताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी २००० मध्ये 'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन केले होते. त्यांनी या शोच्या दुसऱ्या पर्वाचेही सूत्रसंचालन केले होते.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 12:47 PM
views 69  views
Amitabh Bachchan returns to the sets of Kaun Banega Crorepati 18 after recovering from seasonal flu.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्रकृती अस्वस्थ्य असल्यामुळे 'कौन बनेगा करोडपती'मधून काही काळासाठी विश्रांती घेतली होती. आता ते पुन्हा एकदा शोच्या सेटवर परतले असून शोच्या एका नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. या शोचा पुढील भाग १६ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. अमिताभ बच्चन यांनी २००० मध्ये 'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन केले होते. त्यांनी या शोच्या दुसऱ्या पर्वाचेही सूत्रसंचालन केले होते. (Amitabh Bachchan Returns to KBC 18)

नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन सेटवर पोहोचताना दिसत आहेत. एक स्पर्धक त्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारतो, "तुमची प्रकृती ठीक नव्हती, आता कसे आहात सर?" यावर अमिताभ बच्चन आपल्या खास शैलीत त्या स्पर्धकाला विचारतात, "तुम्ही कसे आहात?" स्पर्धकाने "मी ठीक आहे" असे उत्तर दिल्यावर, अमिताभ म्हणतात, "जर तुम्ही ठीक असाल, तर मीही ठीक आहे."

यानंतर अमिताभ बच्चन म्हणतात, "तुमच्या सर्वांचे प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वादांमुळे मी पुन्हा एकदा इथे परतलो आहे." या प्रोमोसोबतच, सोनीलिव्हने पुष्टी केली आहे की शोचा पुढील भाग १६ नोव्हेंबर रोजी प्रसारित होईल. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना हंगामी फ्लू झाला होता. याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्यामुळे त्यांना 'कौन बनेगा करोडपती १८' च्या चित्रीकरणातून काही काळासाठी ब्रेक घ्यावा लागला होता.


ताजी बातमी

View all

Mumbai Goa Highway Accident : अंजणारी पुलावर लक्झरी बसला ट्रकची दुहेरी धडक
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : कोकण रेल्वेचे ध्यासस्वप्न मधू दंडवतेंनी सत्यात उतरवले
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : आदित्य कदमची महाराष्ट्राच्या U-19 फुटबॉल संघात निवड
November 13, 2026
Uday Samant announces Janajatiya Gaurav Diwas Seva Saptah programmes for tribal communities in Ratnagiri
‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

New OTT movies and web series releasing on Netflix, JioHotstar, ZEE5 and Apple TV on November 13, 2026
शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका! रिलिज होणार 'हे' चित्रपट अन् वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी
November 12, 2026
Ranbir Kapoor in Ramayana movie, which sets a record at the UK and Ireland box office.
Ramayana Box Office Collection : रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा जागतिक बॉक्स ऑफिसवर डंका
November 11, 2026
Ranbir Kapoor as Lord Rama in Nitesh Tiwari's Ramayana movie.
रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्या दिवशीही कोटींची कमाई; जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन
November 06, 2026
Ayushmann Khurrana Radhika Apte and Tabu in Andhadhun crime thriller movie
ओटीटीवर पाहा आयुष्मान खुरानाचा जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट
November 04, 2026