LIVE UPDATES

Ramayana Deleted Scene : 'रामायण'मधील डिलीट केलेला तो थरारक सीन...

आपल्‍याला हे माहित आहे का?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 06:22 PM
views 286  views
 Viral deleted scene from Ramayana movie showing Lord Ram rescuing Sita and Lakshman from wild animals.

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबरला 'रामायण' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून सध्या सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या सिनेमातील एका डिलीट केलेल्या सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा थरारक प्रसंग पाहून अनेक प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आल्याचं पाहायला मिळत आहे.

'रामायण' सिनेमातून हटवण्यात आलेल्या या सीनमध्ये लक्ष्मणाच्या हाताला दुखापत झाल्यामुळे सीता त्यांना एका गुहेत आश्रय देते. त्याचवेळी राक्षसांनी सोडलेली काही हिंस्र जनावरं दोघांवर हल्ला करण्यासाठी गुहेत येतात. या जनावरांचा सामना करण्यासाठी सीता आणि लक्ष्मण पुढे सरसावतात. मात्र, जनावरं त्यांच्यावर हल्ला करणार इतक्यात प्रभू श्रीराम तिथे पोहोचतात. ते आपल्या बाणांनी जनावरांवर वार करून सीता आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवतात. हा थरारक प्रसंग जेव्हा थिएटरमध्ये दाखवण्यात आला, तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला दाद दिल्याचं सांगितलं जात आहे. 

विशेष म्हणजे, हा सीन 'रामायण'च्या इंग्रजी आवृत्तीत दाखवण्यात आला होता, अशी चर्चा आहे. मात्र, हिंदी आवृत्तीतून हा सीन हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. हा सीन पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून काही प्रेक्षकांनी तो हिंदी आवृत्तीत का दाखवण्यात आला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

संकलन - स्वप्निल परब

मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद


ताजी बातमी

View all

Kokansad Diwali magazine 2026 praised by renowned Marathi literary figure Gurudas Pandurkar for its cultural and literary value.
Kokansad Diwali Ank 2026 : साहित्यिक फराळाबरोबरच जिवंत सांस्कृतिक दस्ताऐवज
November 14, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026
वरेरी येथे ३८ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
November 14, 2026
दाभोळे तिठा येथे घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला
November 14, 2026
संबंधित बातम्या

View all

Singer Dhvani Bhanushali shares romantic engagement and proposal pictures with Yash Bhanushali, showing her diamond ring.
'वास्ते' फेम ध्वनी भानुशालीने शेअर केले साखरपुड्याचे फोटो; कोण आहे तिचा होणारा जोडीदार? वाचा सविस्तर
November 14, 2026
Sahadev Gaonkar from Sawantwadi, an alumnus of B.S. Bandekar College of Fine Art, who contributed to the Ramayana movie's Animation and VFX team.
‘रामायण’च्या भव्य पडद्यावर झळकले सावंतवाडीच्या सुपुत्राचे नाव
November 13, 2026
Amitabh Bachchan returns to the sets of Kaun Banega Crorepati 18 after recovering from seasonal flu.
KBC 18 Season : 'कौन बनेगा करोडपती १८'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा दमदार कमबॅक
November 13, 2026
New OTT movies and web series releasing on Netflix, JioHotstar, ZEE5 and Apple TV on November 13, 2026
शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका! रिलिज होणार 'हे' चित्रपट अन् वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी
November 12, 2026