LIVE UPDATES

Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा

दीर्घकाळच्या मागणीची नगराध्यक्षांकडून दखल
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 01:22 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : नगरपरिषद क्षेत्रातील फूल मार्केट मधील विक्रेत्यांची दीर्घकाळाची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फूल मार्केटमधील विक्रेत्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व आरोग्य अबाधित राखण्यासाठी वाघ पाणंद येथे लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. फूल मार्केट परिसरात दैनंदिन व्यवहारासाठी येणाऱ्या विक्रेत्यांना स्वच्छतागृहाअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाघ पाणंद येथे ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विक्रेत्यांची ही मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. तसेच, परिसरातील स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी या सुविधेचा मोठा हातभार लागणार आहे.

नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले आणि आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी सर्व विक्रेत्यांना व नागरिकांना आवाहन केले आहे. नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या युरीनल सुविधेचा सर्वांनी योग्य व जबाबदारीने वापर करावा.परिसरात कुठेही अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी.सावंतवाडी शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV
नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#Omkar The Elephant
Omkar Elephant : थेट घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#Omkar The Elephant
Omkar Elephant : थेट घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Kankavli News : कणकवली गडनदीपात्रात बंधारे उभारण्याचे नियोजन
November 02, 2026