LIVE UPDATES

युवा रक्तदाता संघटनेचे युवक धावले मदतीला

गोव्यात जात केलं रक्तदान
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 13, 2026 19:54 PM
views 32  views

सावंतवाडी : गोवा बांबोळी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या दीपक नाईक या रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे युवक मदतीला धावून गेले.

यात गुरुप्रसाद गवळी व परेश कर्पे यांनी सावंतवाडी येथून गोवा बांबोळी रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. तसेच लाईफटाईम रुग्णालय पडवे येथे ॲडमिट असलेल्या देवानंद कासार या रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान तातडीने प्लेटलेट्स ची आवश्यकता होती तेव्हा अक्षय मयेकर, अवधूत गावडे, संदेश नेवगी, संदिप निवळे यांनी सावंतवाडी येथून लाईफ टाईम रुग्णालय रक्तपेढी,पडवे मध्ये जाऊन रक्तदान केले. गणेशोत्सव सारख्या मोठ्या उत्सवाची तयारी चालू असताना देखील माणूसकी दाखविल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले.