
सावंतवाडी : कोकणातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा यांच्याकडून सुप्रसिद्ध ज्येष्ठ मूर्तिकार विलास रामभाऊ मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना यावर्षीचा कोकणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.
या मंडळाचे यंदाचे १२१ वे वर्ष असून मंडळाच्या मुर्तीचे मुर्तीकार श्री. मांजरेकर आहेत. आगमन सोहळ्याच्या निमित्ताने मुर्तीशाळेत हा सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अमरनाथ सावंत, नगरसेवक प्रतीक बांदेकर, उत्सव कमिटी अध्यक्ष राजू भाट, अभय नेवगी, संदेश नेवगी, संकेत नेवगी, अमेय महाजन, श्री. बांदेकर, संतोष खानविलकर, प्रसाद नार्वेकर, हृषीकेश स्वार, दत्तप्रसाद नाटेकर, क्रिश सावंत, बाळा सावंत आदी उपस्थित होते










