
नवी दिल्ली : येत्या आठवड्यात तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार चित्रपट आणि वेब सिरिज पाहता येणार आहेत. या दमदार चित्रपट आणि वेब सिरिजची यादी दिली आहे. क्राईम थ्रिलरपासून ते रोमँटिक ड्रामा आणि सस्पेन्स थ्रिलरचा समावेश असलेले हे चित्रपट आणि वेब सिरिज जिओ हॉस्टस्टार, प्राईम व्हिडिओ, झी 5 आणि नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहेत.
माय बायस, माय बॉस (My Bias, My Boss)
दक्षिण कोरियन रोमँटिक ड्रामा वेबसिरिज तुम्ही प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 'दा-र्यूम' एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीची नोकरीची ऑफर नाकारून एका फॅशन स्टार्टअपमध्ये काम करण्याचा निर्णय घेते. कंपनीत रुजू होण्यापूर्वी, नकळतपणे तिची एका व्यक्तीशी बाचाबाची होते. ती व्यक्ती म्हणजे 'कांग हा-गी' - जो त्या कंपनीचा कठोर आणि कामात मग्न राहणारा सीईओ असतो.
चुंबक (Chumbak)
चुंबक ही वेब सिरिज तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या सिरिजची कथा 'चुंबक' नावाच्या एका वसाहतीभोवती फिरते. जिथे विचित्र स्वभावाची माणसे राहतात. ही एक विनोदी वेब सिरिज असून यात अर्जुन बिजलानी, देवेन भोजानी, नीना गुप्ता, हेली शाह, अनंत जोशी आणि सुमित राघवन यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
मैं ॲक्टर नहीं हूँ (Main Actor Nahi Hoon)
हिंदी ड्रामा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या कथेत एकाकीपणाचा सामना करणाऱ्या दोन व्यक्ती असतात. त्यांच्यामध्ये व्हर्च्युअली एक विशेष नाते निर्माण होते.
लव्ह इन व्हिएतनाम (Love in Vietnam)
भारत-व्हिएतनाम संयुक्त निर्मिती असलेला रोमँटिक ड्रामा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. हा चित्रपटाची कथा मॅडोन्ना इन ए फूर कोट या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मानव नावाचा पंजाबी तरुण व्हिएतनामला जातो. तर त्याची मैत्रीण सिमी पंजाबमध्येच राहते. व्हिएतनाममध्ये मानवाचे एका मुलीच्या प्रेमात पडतो. पण जेव्हा सिमी व्हिएतनाममध्ये येते तेव्हा चित्रपटात एक अनपेक्षित वळण येते.
जीडीएन (GDN)
बायोग्राफिकल ड्रामा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. यामध्ये आर. माधवन मुख्य भूमिकेत आहेत. 'भारताचे एडिसन' म्हणून ओळखले जाणारे गोपालास्वामी दोराईस्वामी नायडू यांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे.
द बर्थडे बॉय (The Birthday Boy)
हा सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटाची कथा शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या पाच मित्रांभोवती फिरते. एका रात्री, वाढदिवस साजरा करत असताना त्यातील एका मित्राचा मृत्यू होतो. हा मृत्यू कसा होतो? त्यामागचे रहस्य तुम्हाला थक्क करून सोडेल.
द ट्रेटर्स सीझन २ (The Traitors Season 2)
हा एक रिअॅलिटी शो असून प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा शो करण जोहरने होस्ट केलेला आहे. या भागात शोमधील बहुतेक स्पर्धक सहभागी झाले होते आणि ते एकमेकांबद्दलच्या तक्रारी मांडताना दिसले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










