LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपरिषदेकडून 'पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव रील्स स्पर्धा'

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 13, 2026 19:25 PM
views 37  views

सावंतवाडी : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा व उत्साहाचा सण आहे. गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक, स्वच्छ व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान 7.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत “पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव रील्स स्पर्धा – २०२६” आयोजित करण्यात येत आहे. 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या रीलमध्ये @sundarwadisawantwadi या सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्याला Tag करून तसेच #EcoGaneshotsav2026 #SawantwadiNagarparishad #पर्यावरणपूरकगणेशोत्सव2026 हे Hashtags वापरावेत. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणाऱ्या आकर्षक व संदेशपर रील्स करण्यात यावे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सर्व सभापती, सर्व सदस्य  यांनी केले आहे.