LIVE UPDATES

घराखाली पुरलेले ३ ड्रम भरून नोटांचे घबाड! ६० कोटींच्या रकमेचे गूढ कायम, पुण्यातील कनेक्शनचीही चर्चा

Cash Found Buried in Uttar Pradesh : तीन ड्रममध्ये भरून ठेवलेल्या नोटांच्या थप्प्या सापडल्यानंतरही ही मोठी रक्कम कुठून आली किंवा ती किती काळापासून तिथे पुरून ठेवली होती याचा उलगडा पोलिसांना अद्याप झालेला नाही.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 03:12 PM
views 116  views
Three drums filled with cash found buried underground at a house in Nawabganj, Uttar Pradesh.

उत्तर प्रदेश : नवाबगंजमधील बराईपूर रामनगर गावात एका घराच्या जमिनीखाली कोट्यवधी रुपये पुरून ठेवल्याची घटना समोर आली होती. मात्र त्या कोट्यवधी रुपयांच्या रक्कमेचे रहस्य २४ तासांनंतरही कायम आहे. तीन ड्रममध्ये भरून ठेवलेल्या नोटांच्या थप्प्या सापडल्यानंतरही ही मोठी रक्कम कुठून आली किंवा ती किती काळापासून तिथे पुरून ठेवली होती याचा उलगडा पोलिसांना अद्याप झालेला नाही. याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार, काही वर्षांपूर्वी पुण्यात काम करत असताना त्याने एका कंपनीची रक्कम घेऊन पलायन केले होते. मात्र, पोलिसांना अद्याप याची खातरजमा करता आलेली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यासोबत झालेल्या वादाच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ही बाब समोर आली. २१ ऑक्टोबर रोजी अभिषेक कुमार नावाच्या शेजाऱ्याने नवाबगंज पोलीस ठाण्यात राजेश यादव आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली होती. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांना त्या घरात मोठी रोख रक्कम लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून जमिनीचे उत्खनन केले.

गुरुवारी संध्याकाळी आयकर विभागाचे सहा जणांचे पथक नवाबगंज पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासोबत नोटा मोजण्याचे यंत्रही होते. जमिनीचे उत्खनन केल्यानंतर एकापाठोपाठ एक असे तीन ड्रम रोख रकमेने भरलेले पाहून पोलीसही थक्क झाले. आता पोलीस या रकमेचा नेमका स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ही रक्कम कोणत्याही आर्थिक किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांशी संबंधित आहे का याचा तपास केला जात आहे. 

रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते, मात्र आयकर विभागाने अद्याप एकूण किती रक्कम सापडली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पोलिसांनी चौकशीसाठी राजेश यादव आणि त्याचा भाऊ राकेश यादव यांना ताब्यात घेतले आहे. ही मोठी रक्कम नेमकी कोणाची आहे, हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

सुरुवातीला, जप्त केलेली रक्कम कोटींच्या घरात असल्याचे वृत्त होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही रक्कम सुमारे ६० कोटी रुपये असावी. परंतु अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही. पोलिसांनी घराच्या सर्व बाजूंनी सील लावले असून परिसराच्या सुरक्षेसाठी कर्मचारी तैनात केले आहेत.

गंगानगरचे डीसीपी सोनम कुमार यांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपास आणि चौकशीतून आतापर्यंत तरी सायबर गुन्हे किंवा इतर कोणत्याही गंभीर गुन्हेगारी कृत्यांशी याचा संबंध असल्याचे दिसून आलेले नाही. डीसीपींच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम कुठून आली किंवा ती कधी आणली गेली याबद्दल आरोपींकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. 


ताजी बातमी

View all

Nilesh Rane addresses a press conference in Kudal and responds to Navnath Ban amid Mahayuti alliance tensions.
Nilesh Rane Navnath Ban : 'नवनाथ बन यांनी स्वतःवर ताबा ठेवावा' निलेश राणेंचा थेट इशारा
October 30, 2026
Nitesh Rane performs the groundbreaking ceremony for a new garden project at historic Devgad Fort in Sindhudurg.
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान
October 30, 2026
Trans Bharat Aviation helicopter reported missing while flying from Badrinath to Dehradun with six people on board.
बद्रीनाथहून डेहराडूनला जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता! वैमानिकासह ६ जणांचा समावेश; एसडीआरएफ, लष्कराकडून शोधमोहीम सुरू
October 30, 2026
शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Chiplun News : चिरेखाण मालकाला महसूलचा दणका
October 30, 2026
Devgad News : देवगड-नांदगाव मार्गावर विनापरवाना चिरे वाहतुकीला दणका
October 29, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Devgad News : 5 अवैध पर्ससीन मासेमारी नौकांवर कारवाई
October 29, 2026
Sawantwadi News : सावंतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
October 28, 2026