
कणकवली : कणकवली येथे 27 मार्च रोजी बांधकाम व्यावसायिक, आणि कळसुली गावचे सुपुत्र असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांचा गोळ्या घालून निर्गुण खून झाला. या खुनातील एक आरोपी पोलिसांनी अटक केला. सुशांत दळवी यांचा ज्या पद्धतीने खून करण्यात आलेला आहे. ते पाहता हे एकट्याचे काम नाही. यात आणखीन काही लोकांचा समावेश असला पाहिजे. जो आरोपी पकडलाय तो आरोपी त्याचे शारीरिक स्थिती पाहता एकट्याने हे कृत्य करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखीन काही लोकांचा समावेश असणे साहजिकच आहे. एखाद्या वेळेला मुख्य आरोपींनी पोलिसांना गुमराह करून मुकादम असलेल्या सुशांत दळवी याच्याच माणसाला या प्रकरणात अडकवले असण्याची शक्यता आहे. पोलीसही या मुळापर्यंत न जाता एक आरोपी अटक करून प्रकरणाला कलाटणी देत असतील तर ते आम्हाला मान्य नाही. ग्रामस्थ म्हणून पोलिसांच्या एकूणच तपासात अजून खोलपणा आला पाहिजे मुख्य आरोपींपर्यंत पोलिस गेले पाहिजेत अशी अपेक्षा आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण पोलीस प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात आणि सुशांत दळवी च्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पर्यंत तपास यंत्रणा पोहोचावी अशी आमची आपल्याकडे मागणी आहे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे














