LIVE UPDATES

185 कोटींचा कथित घोटाळा ; तपासाचा फास आणखीन घट्ट होणार ?

नव्या नावांचा समावेश करण्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 11, 2026 12:39 PM
views 183  views

ठाणे : 185 कोटींच्या कथित MPID गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तपासाचा फास आणखी आवळण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मुख्य आरोपी सागर सुबोध कारिवडेकर, सचिन बाळकृष्ण राणे आणि प्रिती सचिन राणे यांच्यासह आणखी अनेक व्यक्तींना आरोपी म्हणून समाविष्ट करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, सलोनी सागर कारिवडेकर, संध्या राजेंद्र ठक्कर, कुशल राजेंद्र ठक्कर, नितीन गणपत मिस्त्री, तन्वी सुर्वे, सुहास बाळकृष्ण राणे, सचिन कारिवडेकर, रेखा नरेश मोरे, सरोज संदीप कुडतरकर, संदीप रामचंद्र कुडतरकर, स्वरूप संदीप कुडतरकर, प्रशांत विष्णू पांचाळ, प्रशांत गंगाराम शेटये, संतोष एकनाथ तोडकर, तुळजा दिनकर चव्हाण, अनिल अंजय्या भिंगे, प्रणाली एस. परब, धनश्री प्रकाश शेटये, जितेश मारुती कांबळे, श्रेया पारटे, श्रेयस केरकर, वल्लभ राजाराम गावडे, महेंद्र परशुराम पाटेकर, सुरेंद्र पुजारी, रुपेश विलास सावंत, शुभम कनोजिया, श्रेयस संजय केरकर, पवन वामन सावंत आणि ज्योतिबा शिवाजी टापले यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय Kudtarkars Packaging Pvt. Ltd., Bomboo Zone India Foundation, Jay Bharat Shipyard Pvt. Ltd., Anandi Elite Buildwell Pvt. Ltd. आणि Anandi Fintech Pvt. Ltd. या संस्था व कंपन्यांच्या संचालकांसह संबंधितांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, गुंतवणूकदारांनी तपासासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे पुरावे आणि माहिती ठाणे EOW चे तपास अधिकारी रवींद्र मांडलिक यांच्याकडे यापूर्वीच सादर केली होती. मात्र, त्या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तींचा आरोपी यादीत समावेश करण्यात आलेला नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ॲड. राजेश दत्तू काकड यांनी पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने निवेदने सादर करून या प्रकरणाचा प्रभावी, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक तपास करण्याची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्येक निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.