LIVE UPDATES

सावंतवाडी न.प. ला मोठा दिलासा

'त्या' कंपनीचा 'स्टे' अर्ज फेटाळला
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 17, 2026 19:34 PM
views 225  views

सावंतवाडी : जिमखाना येथील बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी इमारतीच्या जागेवरून सावंतवाडी नगरपरिषद आणि 'ग्रो बिग टेक्नॉलॉजी एल.एल.पी.' कंपनी दरम्यान सुरू असलेल्या कायदेशीर वादात नगरपरिषदेला मोठा कायदेशीर विजय मिळाला आहे. 

सावंतवाडी दिवाणी न्यायालयाने ग्रो बिग टेक्नॉलॉजी कंपनीने दाखल केलेला तात्पुरता मनाई हुकूम अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे सावंतवाडीच्या नगराध्यक्षा व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना खूप मोठा दिलासा मिळाला असून नगरपरिषदेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने कंपनीचा अर्ज नामंजूर करत या अर्जाचा खर्च देखील वादी यांनीच सोसावा असा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या स्पष्ट आदेशामुळे कंपनीला मिळालेला कायदेशीर स्टे आता पूर्णपणे हटला असून, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासनाला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.