LIVE UPDATES

फोंडाघाट येथे १.३६ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

प्रसाद नराम, बंटी सावंत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 10:31 AM
views 1042  views

कणकवली: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यावर कारवाई करत १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद महादेव नराम (वय ५२, रा. हवेलीनगर, फोंडाघाट, ता. कणकवली) यांच्या घराच्या मागील बाजूस ठेवलेला गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात बंटी सावंत (वय ३५, रा. कणकवली) याचाही सहभाग असल्नियाचे  निष्पन्न   झाल्याने त्याच्याविरुद्धही अवैध मद्य विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, पोलीस हवालदार आशिष गंगावणे आणि ज्ञानेश्वर तवटे यांनी सहभाग घेतला. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.