LIVE UPDATES

सातार्डा येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 08:07 PM
views 322  views

सावंतवाडी : सातार्डा येथील मंदिरासमोर कल्याण मटका नावाचा अवैध जुगार खेळताना एका इसमावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सत्यवान जाधव (वय ५४, रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सातार्डा येथील मंदिरासमोर पैसे स्वीकारून ‘कल्याण मटका’ हा बेकायदेशीर जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार राजेश गवस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत रोख रक्कम २,३०० रुपये, मोबाईल १०,००० रुपये जप्त करण्यात आले.


ताजी बातमी

View all

Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg
Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026
Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg
Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026
आंबेलीच्या वळणावर एसटी बस-दुचाकीची भीषण धडक
November 19, 2026
Citizens and all-party leaders submit a memorandum to Kudal Police demanding a thorough investigation into recent crimes.
Kudal Crime News : कुडाळमधील स्टेट बँक दरोडा व चैन स्नॅचिंग प्रकरणांची सखोल चौकशी करा
November 19, 2026
रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026