
सावंतवाडी : शहरात अवैध मटका जुगारा विरोधात सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मच्छीमार्केट परिसरामध्ये मोबाईलच्या माध्यमातून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या दोघा संशयितांवर पोलिसांनी कारवाई करत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
सावंतवाडी येथील मच्छीमार्केटमधील काही जण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवरून मटका जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित देवदत्त शेळके, शिव शंभू विर्नोडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान, रोख ११ हजार रुपये तसेच जुगाराचे इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपींना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








