LIVE UPDATES

महिलेच्या पर्समधून तब्बल १२ तोळे दागिने लंपास

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 12:02 PM
views 620  views

सावंतवाडी : बस स्थानक परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून आता थेट एसटी स्थानकातूनच एका महिलेच्या पर्समधून तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने लांबविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसरात ही चोरीची घटना घडली. संबंधित महिला प्रवाशाच्या पर्समधून अज्ञातांनी हातसफाई करत सुमारे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले. ऐन गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीसह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक व तपास पथक तातडीने तपासासाठी सरसावले आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात एक संशयित महिला आणि एक पुरुष असल्याचे निष्पन्न झाले आहे. सावंतवाडी एसटी स्थानक किंवा आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेल्या वर्णनासारखी कोणतीही संशयित व्यक्ती आढळल्यास किंवा या चोरीबाबत काहीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शहरात अशा प्रकारच्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन त्याबाबत नेमकी ऍक्शन कधी घेणार असा सवाल सावंतवाडीकरांकडून विचारला जात आहे.


ताजी बातमी

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
BJP councillors meet Sawantwadi police officials over fake MNGL gas connection calls and online OTP fraud targeting residents.
MNGL Gas Fraud in Sawantwadi : सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
October 31, 2026
वेंगुर्ल्यात १ नोव्हेंबर रोजी महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन
October 31, 2026
कुडाळमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ५ किमी ‘रन फॉर युनिटी’
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Police issue a warning against fake MGL gas connection calls and OTP-based banking fraud targeting residents.
Sawantwadi Scam : शहरात एमएनजीएल गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांना गंडा
October 31, 2026
Sawantwadi police take action against illegal Kalyan Matka gambling in Machhi Market and seize ₹11,000 cash and gambling materials.
Sawantwadi News : सावंतवाडी मच्छीमार्केट परिसरात मटका जुगाराचा पर्दाफाश
October 31, 2026
पोयरे ग्रामसभेतील महिला मारहाण प्रकरणी न्यायालयाचे एफआयआरचे आदेश
October 31, 2026
वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
October 30, 2026