LIVE UPDATES

कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ८ वाहनांचे वितरण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 08:25 PM
views 65  views

कुडाळ : कुडाळ पंचायत समिती, उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचा वितरण समारंभ शुक्रवारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे पार पडला.

यावेळी जि.प.उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, जि.प.सदस्य दीपक नारकर, दिपलक्ष्मी पडते व रूपेश कानडे, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व बचतगटातील महिला उपस्थित होत्या.

आमदार निलेश राणे म्हणाले, 25 मंजूर गाड्यांपैकी 5 गाड्या यापूर्वी वाटप झाल्या असून आज 8 गाड्यांचे वाटप होत आहे. याचा फायदा बचत गटातील महिलांना होणार. राज्यातील महायुती सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार गंभीर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू आली असून आज महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

आज उमेद अंतर्गत महिला बचत गटांना या गाड्यांचे वाटप होत आहे. आता पुढील पाऊस उचलावे, यासाठी उमेदने जिल्ह्यात तशा प्रकारची व्यवस्था उभारावी. कुडाळधमून याची सुरूवात करावी, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ही व्यवस्था आदर्श ठरेल. त्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड यांना सूचना केल्या. युती सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात असून, भरीव निधी जिल्ह्यात उपलब्ध होत असून म्हणूनच आपण सरकारचे आभार मानतो, असे आ. राणे म्हणाले.

सभापती मिलिंद नाईक म्हणाले, शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या गाड्यांचा वापर महिला बचत गटांनी चांगल्या पद्धतीने करून शासनाचे ध्येय साध्य करावे. बचत गटातील महिलांनी या उपक्रमातून स्वावलंबी बनावे. तालुक्यात उमेदचे काम चांगले आहे. अनेक बचत गटांनी दिल्लीपर्यंत भरारी घेतली आहे. भविष्यात असेच चांगले काम उमेदच्या माध्यमातून उभे राहील. दीपक नारकर यांनी कुडाळ मधील गावठी आठवडा बाजार येथील जागेत बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभे राहावे अशी मागणी केली. प्रास्ताविक गणेश राठोड यांनी केले.


ताजी बातमी

View all

वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
October 30, 2026
Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
देवगडच्या वाडातरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीचा छापा
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026
महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार
October 30, 2026