LIVE UPDATES

Kudal Crime News : कुडाळमधील स्टेट बँक दरोडा व चैन स्नॅचिंग प्रकरणांची सखोल चौकशी करा

नागरिकांची पोलिसांकडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 02:44 PM
views 276  views
Citizens and all-party leaders submit a memorandum to Kudal Police demanding a thorough investigation into recent crimes.

कुडाळ : गेल्या महिनाभरात कुडाळ तालुक्यात घडलेले चैन स्नॅचिंग प्रकरण आणि स्टेट बँकेवर दरोडा घालण्याचा प्रयत्न, या दोन्ही गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आज कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.

या दोन्ही प्रकरणांतील आरोपी हे स्थानिक असून सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. मात्र, या व्यक्ती एका विशिष्ट संघटनेचे काम करत असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. या संघटनेच्या विचारधारेतून काम करत असताना त्यांचा उद्देश केवळ चोरी करणे हा नसून समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नवीन पिढी ओढली गेल्यास जिल्ह्यात सामाजिक विषमता निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग हा शांततापूर्ण, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेला पर्यटन जिल्हा म्हणून देशभरात नावारूपास येत आहे. पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अनेक व्यावसायिकांनी बँकांची कर्जे घेऊन मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, अशा प्रकारच्या जबरी चोरी आणि दरोड्याच्या घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्याचा थेट फटका स्थानिक गुंतवणूकदारांना बसेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळू नये आणि जिल्ह्याची शांतता अबाधित राहावी, यासाठी या दोन्ही प्रकरणांच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय तुकाराम शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विजय प्रभू, राजन नाईक, बाळा पावसकर, मंदार शिरसाट आदींच्या सह्या आहेत.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026
Sawantwadi Crime: एसटी बसमध्ये चढताना वृद्धाच्या खिशातील ५,५०० रुपये लंपास
November 18, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Devgad News : देवगड समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर नौका जप्त
November 18, 2026
Kankavli Police Arrest Accused in Minor Girl POCSO Sexual Assault Case
Kankavli Crime News : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर संशयितास अटक
November 17, 2026