LIVE UPDATES

Kudal Bank Robbery : कुडाळमध्ये भरदिवसा राष्ट्रीयकृत बँकेवर चाकूचा धाक दाखवून दरोडा

लाखोंची रोकड लुटून पळणाऱ्या संशयिताला नागरिकांनी पकडले ; पोलिसांच्या ताब्यात दिले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 04:44 PM
views 336  views
Police investigating a bank robbery at a nationalised bank in Panbazar, Kudal, Sindhudurg, where a knife-wielding suspect was caught by locals.

सिंधुदुर्ग : कुडाळ शहराच्या पानबाजार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली. एका तरुण संशयिताने बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लांबवली. मात्र बँक कर्मचारी आणि सतर्क नागरिकांच्या धाडसामुळे हा दरोडा उधळून लावला गेला. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित दरोडेखोराला नागरिकांनी शिताफीने पकडून चांगलाच चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्राप्त माहितीनुसार, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक तरुण संशयित कुडाळ पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कस्टमरच्या वेषात घुसला. त्याने अत्यंत चलाखीने बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवला आणि भीतीचे वातावरण निर्माण करत कॅश काउंटरवरील लाखो रुपयांची रोकड बळकावली. रोकड हाताशी येताच संशयिताने तिथून पळ काढला.

संशयित तरुण रोकड घेऊन पळत सुटत असतानाच बँक कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला. या आवाजाने बँकेबाहेरील आणि परिसरातील नागरिक तातडीने सतर्क झाले. नागरिकांनी आणि उपस्थितांनी कोणतीही वेळ न घालवता त्वरित पाठलाग करत त्या संशयित दरोडेखोराला जेरबंद केले. संतप्त नागरिकांनी या चोराला चांगलाच चोप देत त्याच्या ताब्यातील लुटलेली रोकड जप्त केली आणि नंतर त्याला कुडाळ पोलिसांच्या हवाले केले.

घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक प्रमोद काळसेकर आणि त्यांचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात या गुन्ह्यात आणखी एका संशयिताचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, पोलीस त्या दुसऱ्या संशयिताचा कसून शोध घेत आहेत.

दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे कुडाळ शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून भीतीसह संताप व्यक्त होत आहे. कुडाळ पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


ताजी बातमी

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
November 16, 2026
Sawantwadi Crime News : मळेवाड पंचक्रोशीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट
November 16, 2026
Amitabh Bachchan and Abhishek Bachchan amid reports of fresh death threats
Bachchan Family Threat : अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लोंची फेसबुक पोस्ट चर्चेत
November 16, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Chiplun Gold Theft News : चिपळूण बसस्थानकात महिलेचे ५.१७ लाखांचे दागिने लंपास
November 15, 2026