LIVE UPDATES

Chiplun Gold Theft News : चिपळूण बसस्थानकात महिलेचे ५.१७ लाखांचे दागिने लंपास

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 15, 2026 01:26 PM
views 130  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

चिपळूण  : येथील भोगाळे एसटी स्थानकात गुहागरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्सची चेन उघडून तब्बल ५ लाख १७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

शनिवार दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सौ. शिवानी सचिन गावडे (३३, व्यवसाय- गृहिणी, सध्या रा. बेडेकरनगर, दिवा, मुंबई; मूळ रा. शिरवळी वेलोंडेवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शिवानी गावडे या १४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास चिपळूणमधील भोगाळे एसटी स्थानकावर गुहागरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्सची चेन अत्यंत शिताफीने उघडली आणि पर्समधील दागिन्यांचे लहान पाकीट व इतर ऐवज लबाडीच्या इराद्याने चोरून पोबारा केला. 

चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये तब्बल ५ लाख १७ हजार ५०० रुपये किमतीच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना, प्रत्येकी २५ हजार व २० हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे झुमके, २५ हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या पट्ट्या, ३.५ ग्रॅम वजनाची अंगठी, ५० हजार रुपये किमतीचा १० ग्रॅमचा सोन्याचा ऐवज, ४५ हजार रुपये किमतीचा ९ ग्रॅमचा दागिना, प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ब्रेसलेट, १५ हजार रुपये किमतीचे कर्णभूषण, ५ हजार रुपये किमतीचा १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मणी तसेच इतर मौल्यवान ऐवज आणि पांढऱ्या रंगाच्या छोट्या पाकिटाचा समावेश आहे.

बसमध्ये चढल्यानंतर पर्सची चेन उघडी असल्याचे आणि आतील दागिने गायब असल्याचे लक्षात येताच सौ. गावडे यांना धक्का बसला. स्थानक परिसरात शोधाशोध करूनही चोरट्याचा थांगपत्ता न लागल्याने त्यांनी शनिवारी रात्री ८.१५ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एसटी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चिपळूण पोलीस अज्ञात चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.


ताजी बातमी

View all

Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
November 16, 2026
TVS ज्युपिटर स्कूटर कोण जिंकणार? ग्राहकांची उत्सुकता शिगेला
November 16, 2026
पीक कर्ज प्रमाणात वाढ करणेबाबत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार
November 16, 2026
Maharashtra subordinate court employees announcing an indefinite strike over salary demands
Maharashtra Court Employees Strike : समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
November 16, 2026
संबंधित बातम्या

View all

Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
November 16, 2026
Sawantwadi Crime News : मळेवाड पंचक्रोशीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट
November 16, 2026
Amitabh Bachchan and Abhishek Bachchan amid reports of fresh death threats
Bachchan Family Threat : अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लोंची फेसबुक पोस्ट चर्चेत
November 16, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026