
सावंतवाडी : मळेवाड पंचक्रोशीत सध्या भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उभ्या असलेल्या डंपर, कॅन्टर यांसारख्या वाहनांमधील महागड्या बॅटऱ्या तसेच शेतातील पाण्याचे पंप चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे.
मळेवाड, साटेली, सातार्डा तसेच आजूबाजूच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या किंमती बॅटऱ्या आणि शेतातील पंप चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. ऐनवेळी वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जात असल्याने वाहनधारकांचे नुकसान होत असून, शेतपंप चोरीमुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत असून यामुळे एकच खळबळ उडाली आली.
या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे वाहनधारक, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी ,रस्त्याच्या बाजूला उभी असलेली वाहने आणि शेतातील साहित्य सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी तसेच चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी मळेवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.भुरट्या चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे आता ग्रामस्थांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








