LIVE UPDATES

Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा

पोलिसांना शिवीगाळ, अधिकाऱ्याला मारली थापड : महिलेवर गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 16, 2026 08:55 PM
views 267  views

कणकवली : रविवारी रात्री नऊ ते साडे दहाच्या सुमारास पुणे येथील एका महिलेने कणकवलीत बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आणि नंतर रस्त्यावर येऊन सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत जोरदार धिंगाणा घातला. पोलिसांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनाही अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर तिला कणकवली पोलीस स्थानकात नेण्यात आले. तिथेही तिने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तर एका अधिकाऱ्याला थापटाने मारत शासकीय कामकाजात अडथळा आणला. याप्रकरणी सदर महिलेवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास कणकवलीतील एका हॉटेलमधून 112 क्रमांक डायल करून एक महिला हॉटेलमध्ये धिंगाणा घालत असल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यावेळी ती महिला रस्त्यावर उतरून जोर जोरात ओरडत अश्लील शिव्या घालत होती. या प्रकारामुळे त्या ठिकाणी गर्दी जमून वाहतूक कोंडी झाली. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलाविले.

महिला कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महिलेची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर महिलेला पोलिसांनी कणकवली पोलीस ठाण्यात नेले. पोलिस स्थानकात त्या महिलेने गोंधळ घातला तसेच पोलिसांना शिवीगाळ केली. यावेळी एका महिला पोलीस हवालदराच्या वर्दीवर हात घालत शिवीगाळ केली.

त्याचवेळी कणकवली पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याजवळ थापटाने मारून शासकीय कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्या महिलेवर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन आणि शिवीगाळ करत पोलिसांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा या कलमाखाली तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


ताजी बातमी

View all

TVS ज्युपिटर स्कूटर कोण जिंकणार? ग्राहकांची उत्सुकता शिगेला
November 16, 2026
पीक कर्ज प्रमाणात वाढ करणेबाबत प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार
November 16, 2026
Maharashtra subordinate court employees announcing an indefinite strike over salary demands
Maharashtra Court Employees Strike : समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
November 16, 2026
सोनुर्ली शाळा नंबर १ च्या नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन
November 16, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Crime News : मळेवाड पंचक्रोशीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट
November 16, 2026
Amitabh Bachchan and Abhishek Bachchan amid reports of fresh death threats
Bachchan Family Threat : अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लोंची फेसबुक पोस्ट चर्चेत
November 16, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Chiplun Gold Theft News : चिपळूण बसस्थानकात महिलेचे ५.१७ लाखांचे दागिने लंपास
November 15, 2026
दाभोळे पोखरबाव येथील ३० वर्षीय तरुणाचे अपहरण
November 14, 2026