LIVE UPDATES

Kankavli POCSO Case : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन

ॲड. उमेश सावंत यांचा युक्तीवाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 08:04 PM
views 98  views

कणकवली : घरगुती संबंधांचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी व्हॉटस्ॲप, फेसबुक, मेसेंजरद्वारे प्रेमसंबंध निर्माण करत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित रितेश रामचंद्र चव्हाण याची अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले,

जून २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये फिर्यादीने ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यातून होकार मिळताच सातत्याने व्हॉटसअप, फेसबुक, मेसेंजर याद्वारे संपर्क साधून तीच्याशी जवळकीक निर्माण केली. त्यानंतर घरात एकटी असताना लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही शाळा चूकवायला लावून तिला विविध ठिकाणी फिरण्यासाठी येण्यास भाग पाडले. भेटवस्तुही दिल्या.

दरम्यान, फिरायला येण्यास तिने नकार दिला असता घरच्यांना फोटो व मेसेज दाखविण्याची धमकी दिली. अखेरीस पडितेने आपल्या आईवडिलांना कल्पना दिली असता संशयित आरोपीला समजावून सांगितले. मात्र, संशयित आरोपीने वडिलांना धमकी दिली. असे असताना संशयित आरोपी पुन्हा पिडीतेशी संपर्कासाठी फोन करू लागला म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपीवर भा.न्या.सं. कलम ६४, ६४ (२ आय व एम), तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १० व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीच्यावतीने जामिनासाठी दाखल अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने २५ हजारांचा जामिन मंजूर करताना पिडीतेशी संपर्क साधू नये, तपासात ढवळाढवळ करू नये आदी अटी घातल्या आहेत.


ताजी बातमी

View all

Lutru Mahadev Temple in Solan Himachal Pradesh where devotees offer lit cigarettes to Lord Shiva
Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026
Omkar Elephant : सावंतवाडी, वेंगुर्ल्यात धुमाकूळ घातल्यानंतर ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गात
November 21, 2026
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.
कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026
Konkan Railway trains delayed at Sawantwadi railway station due to operational disruptions
Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

Tilari Ghat bike accident in Dodamarg where nursing students and MSRTC staff helped injured riders
Tilari Ghat Bike Accident : तिलारी घाटात दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू
November 21, 2026
Damaged Mahindra XUV 3XO after accident at Veral Ghat in Lanja taluka
Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दगडावर आदळून अपघात
November 21, 2026
Nitesh Rane meets Sindhudurg Superintendent of Police Mohan Dahikar in Sawantwadi
Nitesh Rane : पालकमंत्री नितेश राणेंची सावंतवाडीत एसपींसह बैठक
November 21, 2026
Sawantwadi Crime News : सावंतवाडी पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत
November 20, 2026