LIVE UPDATES

गाव तेथे उद्योजक या संकल्पनेवर महाराष्ट्र चेंबरची बैठक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 03:22 PM
views 43  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर च्या वतीने ग्रामीण भागाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विशेष बैठकीत सादर करण्यात आली. या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात किमान एक नवीन उद्योजक यशस्वीपणे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या बैठकीला ‘मसिआ’(MACCIA) च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजेंद्र केसरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल वालावलकर, गव्हर्निंग कौन्सिल (GC) सदस्य कुणाल वरसकर आणि कार्यालयीन समन्वयक आग्नेल फर्नांडिस प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला‘मसिआ’चे गव्हर्निंग कौन्सिल (GC) सदस्य कुणाल वरसकर यांनी (मसिआ) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर या संघटनेची मुख्य ओळख करून दिली.

या नाविन्यपूर्ण कल्पनेचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले, "वेंगुर्ला तालुक्याची आर्थिक प्रगती आणि समृद्धी वाढवण्यासाठी ही संकल्पना मैलाचा दगड ठरेल. ज्या कोणाला व्यवसायात रस आहे, ते कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी मसिआकडे येऊ शकतात. आम्ही त्यांना सर्व प्रकार सहकार्य करण्यास तयार आहोत. याच उद्देशाने आम्ही कुडाळ एमआयडीसी (MIDC) परिसरात सर्वांसाठी एक विशेष प्रशिक्षण केंद्रही सुरू केले आहे.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र केसरकर यांनी प्रास्ताविक केले. गावपातळीवरील व्यवसाय साखळी कशी काम करेल, यावर प्रकाश टाकत ते म्हणाले, ही संकल्पना गावातून तालुक्याकडे, तालुक्यातून जिल्ह्याकडे आणि जिल्ह्याकडून थेट राष्ट्रापर्यंत जोडली जाईल. आपण सर्वांनी एकत्र येऊन गावातील गरजू व तरुण घटकांना ही संधी दिली पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसायात स्वतःचे साम्राज्य उभे करावे, यासाठी मसिआ त्यांना सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या प्रक्रियेपर्यंत सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे.

या मोहिमेला गती देण्यासाठी ‘मसिआचे उपाध्यक्ष आणि माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनीही मार्गदर्शन केले. त्यांना ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आणि ग्रामीण भागाचा दांडगा अनुभव असल्याने ते म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायत कशी काम करते आणि त्यांच्या स्थानिक भागात व्यवसायाची काय क्षमता आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आपण जर या स्थानिक क्षमतेचा अचूक शोध घेऊन तरुणांना योग्य दिशा दाखवली, तर आपण आपल्या ध्येयापासून फार दूर नाही. चला, आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणूया.

वेंगुर्ला पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व गावांच्या सरपंचांना एकत्र आणून या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आणि विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी यांच्यासह तालुक्याच्या विविध गावांमधील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
October 27, 2026