LIVE UPDATES

नगरसेवक प्रतीक बांदेकर यांच्या पाठपुराव्याला यश

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 03:29 PM
views 53  views

सावंतवाडी : शहरातील लोकवस्तीत गवे, बिबटे आणि अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शिरोडा नाका ते नरेंद्र डोंगर परिसरातील जंगल आणि लोकवस्तीच्या सीमेवर तारेचे कुंपण उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

नरेंद्र डोंगर परिसरातील जंगलातून वन्यप्राणी थेट शहरातील बाजारपेठेत आणि लोकवस्तीत येत असल्याच्या घटना घडत होत्या. सायंकाळच्या वेळी शिरोडा नाका परिसरात गवे दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याशिवाय, या भागात बिबटे आणि हत्तींचाही वावर अधूनमधून आढळून आला होता. त्यामुळे वन्यप्राण्यांना शहरात येण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत होती.

सालईवाडा भागाचे नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी जंगलातून लोकवस्तीत येणाऱ्या वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी तारेचे कुंपण उभारण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा नियोजनमधून कुंपणासाठी निधी मंजूर करण्यात आला.

2023 मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती.त्यानंतर बांदेकर यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या काही दिवसांपासून शिरोडा नाका ते नरेंद्र डोंगराच्या जंगलालगतच्या लोकवस्तीच्या सीमेवर कुंपण उभारण्याचे काम वेगाने सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले आहे.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
October 27, 2026