LIVE UPDATES

Sawantwadi Prernabhoomi : सावंतवाडी प्रेरणाभूमीच्या विकासासाठी बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी

स्मृती परिषदेत दोन ठराव मंजूर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 03:14 PM
views 52  views
Memorial conference at Prernabhoomi in Sawantwadi highlighting Buddhist cultural heritage

सावंतवाडी : आमच्या पूर्वजांनी बौद्ध सांस्कृतिक शिल्पकला घडविली, स्मारक घडविली, स्तूप घडविले ज्यामुळे आज आम्हाला कळते आहे की,अडीच हजार वर्षांपूर्वी या देशांमध्ये काहीतरी घडून गेलं होतं. ब्रिटिशांनी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून बौद्ध सांस्कृतिक वारसा जगासमोर प्रथम आणला. ज्यांनी बौद्ध स्थळांचं विकृतीकरण केलं त्यांच्याकरिता कडक कायदे केले. बुद्ध काल्पनिक नसून ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते हे 1838 साली आम्हाला प्रथम कळले. ब्रिटिशांनी पुरातन स्थळांचं खोदकाम केलं आणि पाली आणि सिंहली भाषेच्या माध्यमातून त्यांनी हा सांधा जोडण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक धम्मसंगिनी रमा गोरख यांनी प्रेरणाभूमी सावंतवाडी येथील स्मृती परिषदेमध्ये केले. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणाभूमीचे अध्यक्ष डि. के. पडेलकर हे होते. तर सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मालवण शाखेचे अध्यक्ष- समाजभूषण संदीप कदम, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव- संजय कदम, युगनायक संस्थेचे मिलिंद माटे, कणकवली तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव- संजय कदम, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अभय पावसकर,गोवा येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत जाधव, निवृत्त बौद्ध अधिकारी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम एलआयसी चे माजी अधिकारी रवी किशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते

परिषदेच्या सुरुवातीला विशेष अतिथी मानवंत आणि समता प्रेरणाभूमीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समाज मंदिर आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर समता प्रेरणाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रेरणाभूमीच्या सल्लागार ममता जाधव, मीनल जाधव, प्रज्ञा जाधव,मीनाक्षी जाधव, आर्या जाधव यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. यासाठी संगीत साथ संदेश जाधव, लक्ष्मण जाधव व सहकारी यांनी दिली. प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून मान्यवरांना संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सन्मानित केले . कार्याध्यक्ष अंकुश कदम यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

उपनगराध्यक्ष अनिल नरवडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये आपण बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे या पदापर्यंत पोहोचलो असून आपल्या महामानवांशी निगडीत सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्याची आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. यासाठी आपण व्यक्तिशः व नगरपरिषदेमार्फत आवश्यकते सहकार्य करणार आहोत.

सावंतवाडी प्रेरणाभूमीच्या विकासासाठी आपण आवश्यक ती आर्थिक तरतूद करून ठेवल्याचे  त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्यासोबत संदीप कदम, सूर्यकांत कदम, संजय कदम, मिलिंद माटे, कुडाळचे संजय कदम, रवीकिशोर चव्हाण आदी मान्यवरांनी आपले शुभेच्छा पर विचार व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या वतीने विद्यमान उपनगराध्यक्ष यांचेकडे एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये सद्यस्थितीतील स्मारकाचे उद्यानरूप बदलून सावंतवाडीतील हे ठिकाण परिवर्तनवादी चळवळीचे एक संस्मरणीय केंद्र व्हावे यासाठी या जागेवर एक बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

परिषदेमध्ये सर्वच मान्यवरांनी प्रेरणाभूमी चळवळीने केलेल्या आजवरच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करीत संस्थेच्या भावी मार्गक्रमणाला शुभेच्छा दिल्या. दुपारी अल्पोपहार नंतर आंबोली येथील दिव्या जाधव या विद्यार्थिनीने 'मी रमाई बोलतेय...' हा एकपात्री प्रयोग करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माजगावचे सिद्धार्थ जाधव यांनी बुद्ध- भीम गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. परिषदेमध्ये दोन ठराव बहुमताने संमत करण्यात आले. परिषदेसाठी माजी नगरसेवक विलास जाधव, धम्मचारी तेजबोधी, पी बी चव्हाण, ऍड नामदेव मटकर, नरसू रेडकर, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, दिलीप जाधव, बुधाजी कांबळी, मधू मातोंडकर, नरेश कारीवडेकर, अनिल जाधव, श्रद्धा कदम, दीपक जाधव, सिताराम जाधव, विजय जाधव,गौतम तांबे, महेश पेडणेकर, राजेंद्र कांबळे तसेच प्रेरणाभूमीचे वासुदेव जाधव, भावना कदम, विठ्ठल कदम, शांताराम असनकर, चंद्रशेखर जाधव, दीपक जाधव, मिलिंद नेमळेकर,आदी प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
October 27, 2026