LIVE UPDATES

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 03:26 PM
views 36  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे सावंतवाडी येथे शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुक्ताई ॲकेडमीच्या चौदा वर्षीय साक्षी रामदुरकर हीने या स्पर्धेत मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात निर्विवाद पहिला क्रमांक पटकावला.

साक्षीने पाच वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करुन अव्वल राहण्याचा पराक्रम केला आहे. सलग पाच वर्षे साक्षीची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. मागील पाच वर्षात साक्षीची शालेय कॅरम स्पर्धांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. 

साक्षी सोबत मुक्ताई ॲकेडमीचे स्मित सावंत, हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, जयेश जाधव या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी रामदूरकर हीने हे यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे श्री. पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी रामदूरकर ही विभागस्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी सलग पाच वर्षे आणि राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी सलग चार वर्षे निवड होणारी कोकणातील एकमेव विदयार्थीनी आहे. या वर्षी स्मितसोबत पहिल्यांदाच सहभाग घेणा-या राष्ट्रीय बुदधिबळपटू हर्ष व चिदानंद यांनी तीन खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक दिली.

मागील दहा वर्षात श्री. पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई ॲकेडमीच्या तीन विदयार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर आणि सोळा विदयार्थ्यांची राज्य स्तरावर निवड झाली आहे. सर्व स्तरातून साक्षीचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर यांनी साक्षीला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
बांद्यात दिवाळीनिमित्त डबलबारीचा जंगी सामना, नरकासुर स्पर्धेचेही आयोजन
October 27, 2026
बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Devgad News : कुंजल गावकरची विभागीय स्पर्धेसाठी निवड
October 27, 2026
‘आरोग्याची साथ, देवगड पर्यटनाची’ ब्रीद वाक्यावर देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन
October 26, 2026
भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी अन् कुठे रंगणार सामना? वाचा सविस्तर
October 26, 2026
Ishan Kishan ruled out of the third T20I against New Zealand due to an adductor strain
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर
October 26, 2026