
वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा खालची केरवाडी येथील रहिवासी हिरोचन लक्ष्मण चोपडेकर (50) हे साईबा मंदिर समोरिल केरवाडी खाडीमध्ये पारंपरिक मच्छिमारी करीत असताना खाडीच्या पाण्यात तोल जाऊन खाडीपात्राच्या खोल पाण्यात पडून मृत्यू झाला. याबाबत त्यांचे भाऊ बाळकृष्ण लक्ष्मण चोपडेकर यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
दरम्या, ही घटना बुधवार 5 ऑगस्ट रोजी 5:30 ते 6:30 वाजता घडली. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रसाद कदम हे अधिक तपास करीत आहेत.












