LIVE UPDATES

चाकूने 30 वेळा वार करत शिक्षिकेची हत्या

एकतर्फी प्रेमातून फरीदाबाद येथे शाळेत हल्ला : आरोपीला अटक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 04, 2026 15:56 PM
views 60  views

हरियाणा : फरीदाबाद येथे सोमवारी शाळेत एका शिक्षिकेवर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्या शिक्षिकेचा मृत्यू झाला असून संशयित आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुध्द काही दिवसांपूर्वी महिला शिक्षिकेने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या वेळी आरोपीने शिक्षिकेची सर्वांसमोर माफी मागितली होती. 

फरीदाबादमधील एका शाळेत घुसून संध्या शर्मा (२५) या शिक्षिकेची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी अमित या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अमितचे संध्यावर एकतर्फी प्रेम होते. गेल्या वर्षभरापासून त्याला आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करायच्या होत्या, परंतु संध्याने त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले होते असे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर अमितने तिची सर्वांसमोर माफी मागितली होती. त्यानंतर संध्याने आपली शाळा आणि राहण्याचे ठिकाण बदलले होते. याचा अमितला राग होता. याच रागापोटी अमित सोमवारी मास्क घालून सकाळी साडे-नऊच्या सुमारास संध्याच्या शाळेत पोहोचला. त्याने तिच्या पतीचे नाव घेऊन तिला वर्गाबाहेर बोलावले. ती बाहेर येताच अमितने तिची वेणी पकडली, तिला ओढत बाहेर आणले आणि तिच्यावर चाकूने वार केले.

अमितने महिला शिक्षिकेच्या चेहऱ्यावर आणि पोटावर 20 वेळा वार केल्याची माहिती प्राप्त होत आहे. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवरही अमितने चाकू उगारला. त्यानंतर तो दुचाकीवरुन पसार झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर संध्या महिला शिक्षिका संध्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपी युवकाला घटनेच्या दोन तासांच्या आत अटक करण्यात आली.