
कणकवली :मुंबई मटका नावाच्या जुगारावर लोकांकडून पैसे स्विकारताना आढळल्याप्रकरणी विजय गणपत कदम (४५, रा. कणकवली – टेंबवाडी) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलिसांनी कणकवली बाजारपेठेत, आचरा रस्त्यालगत एका पान स्टॉलच्या बाजूला मंगळवारी दुपारी १.१५ वा. सुमारास केली. यात ९ हजार ४८० रुपये जप्त करण्यात आले. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रतिश पाटील, कॉन्स्टेबल सुशांत कोलते, कॉन्स्टेबल सचिन माने आदी सहभागी झाले होते. फिर्याद कॉन्स्टेबल सुशांत कोलते यांनी दिली.











