LIVE UPDATES

दोडामार्ग हरिजनवाडी येथे ३७ वर्षीय युवकाची आत्महत्या

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 20:52 PM
views 41  views

दोडामार्ग : आयी हरिजनवाडी येथे ३७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. बाबुराव संतोष जाधव असे मृत युवकाचे नाव असून या प्रकरणी दोडामार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय युवक बाबुराव जाधव यांनी मंगळवारी रात्री ९.३० ते बुधवारी पहाटे ४.३० या कालावधीत राहत्या घरी गळफास घेतल्याचा कयास वर्तविला जात आहे. घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याबाबत सुलोचना संतोष जाधव (६०, रा. आयी हरिजनवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोडामार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.