LIVE UPDATES

मालवणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला वेग

पहिल्या टप्प्यात २०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 05:40 PM
views 39  views

मालवण : मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासह नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने निर्बीजीकरण व लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २०० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती मालवण नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे. 

मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या कामासाठी वार्षिक निविदा प्रक्रियेद्वारे नागपूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात येत आहे.

मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांची अनियंत्रित वाढ रोखणे, कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांना उद्भवणारा धोका कमी करणे, तसेच रेबीजसारख्या गंभीर आजारांचा प्रसार रोखण्यास मदत करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. निर्बीजीकरणामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असून, लसीकरणामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण लाभ होणार आहेत.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २०० भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण व लसीकरणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यांतही ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू ठेवण्याचे नगरपरिषदेचे नियोजन आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या केवळ तात्पुरत्या स्वरूपात न हाताळता, शास्त्रीय पद्धतीने आणि सातत्यपूर्ण उपाययोजनांच्या माध्यमातून नियंत्रणात आणण्यावर प्रशासनाचा भर आहे.

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, तसेच भटक्या कुत्र्यांबाबतच्या समस्या निदर्शनास आल्यास नगरपरिषद प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्यात, यासाठी १८००२३३४३८१ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

भडगावच्या उपसरपंचपदी प्रथमेश मोहिते
October 27, 2026
फोंडाघाट शिक्षक अजितकुमार देठे यांच्या न्यायासाठीचे आंदोलन स्थगित
October 27, 2026
डॉ. चंद्रकांत सावंत यांचे देव गांगोबा मंदिरासाठी १ लाख ७२ हजारांचे योगदान
October 27, 2026
मिठमुंबरी बागवाडी येथील मच्छीमारांना धमकावल्याप्रकरणी कारवाईची मागणी
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

भडगावच्या उपसरपंचपदी प्रथमेश मोहिते
October 27, 2026
फोंडाघाट शिक्षक अजितकुमार देठे यांच्या न्यायासाठीचे आंदोलन स्थगित
October 27, 2026
डॉ. चंद्रकांत सावंत यांचे देव गांगोबा मंदिरासाठी १ लाख ७२ हजारांचे योगदान
October 27, 2026
सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026