
कुडाळ : माणगाव कट्टावाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणी हाॅटेल व्यावसायिक शिवराम उर्फ संदेश केसरकर यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने केसरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केसरकर यांच्या निवासस्थानी भेट देत केसरकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिवंगत संदेश केसरकर यांचे सुपुत्र मितेश केसरकर, त्यांचे सख्खे बंधू शामा केसरकर तसेच सख्खे चुलत बंधू आणि पत्रकार भरत केसरकर यांची भेट घेतली. कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी या दुःखद प्रसंगात त्यांना धीर दिला आणि दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यासह संपूर्ण शिवसेना केसरकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दत्ता सामंत यांनी दिली. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांच्या सोबत आहेत, असा विश्वास त्यांनी दिला. सांत्वन करताना त्यांनी केसरकर कुटुंबीयांच्या पाठीवर मायेचा हात ठेवत त्यांना धीर दिला.
या भेटीप्रसंगी माणगावचे माजी सरपंच तथा शिवसेना माणगाव विभागप्रमुख सचिन धुरी, मेघश्याम पावसकर, दिनेश माणगावकर, संदीप गावडे, अवधूत सामंत आदी उपस्थित होते. दिवंगत संदेश केसरकर यांच्या निधनाने केसरकर कुटुंबीयांवर ओढवलेल्या दुःखात सहभागी होत शिवसेना नेतृत्वाने दिलेला हा मायेचा आधार आणी विश्वास कुटुंबीयांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








