LIVE UPDATES

बोअरवेलमधील पंप चोरीला

कोळपे बौद्धवाडी येथील प्रकार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 13, 2026 06:49 PM
views 99  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वैभववाडी  : शेतीच्या पाण्यासाठी बोअरवेलमध्ये बसविलेला शेती पंप, त्याला जोडलेली केबल आणि पाण्याचा पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना कोळपे-बौद्धवाडी येथे घडली आहे. या चोरीत शेतकऱ्याचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मनोज राजाराम कांबळे (वय ४३, रा. कोळपे तांबळवाडी, ता. वैभववाडी) यांनी  पोलिसांत तक्रार दिली आहे.

कांबळे यांची कोळपे बौद्धवाडी येथील माळावर शेती आहे. शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी २०१६ मध्ये बोअरवेल खोदली होती. या बोअरवेलमध्ये पंप बसविण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी पंपामध्ये बिघाड झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी त्यांनी  दुरुस्ती करणारा तंत्रज्ञ याच्याशी संपर्क साधला होता.त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तंत्रज्ञ अक्षय शामराव बोडके (रा. निगवे भुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे अन्य तीन जणांसह कांबळे यांच्या शेतात आले.

त्यांनी बोअरवेलमधील पंप बाहेर काढून दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंप पुन्हा बोअरवेलमध्ये बसविण्यात आला.पंपाच्या दुरुस्ती नंतर श्री कांबळे यांनी पंप सुरू करून रात्री आठच्या सुमारास तो बंदही केला.त्यानंतर

दुसऱ्या दिवशी (ता.१३)सकाळी साडेसहाच्या सुमारास कांबळे शेतात गेले. पंप सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला; मात्र स्टार्टर सुरू होत नव्हता. त्यामुळे त्यांनी बोअरवेलजवळ जाऊन पाहणी केली असता पाण्याची काळी पाइप आणि दोरी कापलेली दिसून आली.

बोअरवेलमध्ये सोडलेली पाण्याची पाइप, पंपाला बांधलेली दोरी तसेच पंप आणि त्याची केबल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पंप आणि साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी गावचे पोलिस पाटील आदित्य कांबळे यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधितांशी संपर्क साधून बोअरवेलची पाहणी करण्यात आली. मात्र, पंपासह अन्य साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

 या घटनेत सुमारे दहा हजार रुपये किमतीचा  पंप, केबल आणि पाण्याची पाइप चोरीला गेल्याचे कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून वैभववाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.


ताजी बातमी

View all

उपजिल्हा रुग्णालय परिसरातील पायऱ्यांचे रूप पालटले
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg Political News : कणकवलीत रंगला १९८३ च्या शिवसैनिकांचा स्नेह मेळावा
November 13, 2026
Maharashtra Minister Uday Samant speaks about Deputy Chief Minister Eknath Shinde's leadership.
Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास : डॉ. उदय सामंत
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
District-Level Presentation Competition : जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा संपन्न
November 13, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Crime News : सावंतवाडीत शाळकरी अल्पवयीन मुलगा-मुलीला दोन तास ठेवले डांबून
November 12, 2026
Naigaon railway station incident where a woman was allegedly pushed from a local train
लोकलमधील छेडछाडीला विरोध केला अन् तरुणीला ट्रेनमधून ढकलले; नायगावच्या घटनेत तरुणीने गमावला हात
November 12, 2026
Rajapur Police seize Goa-made foreign liquor, two-wheeler and mobile phones worth ₹83,020.
Illegal Goa Liquor Seized : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : दोडामार्ग बाजारपेठेत परप्रांतीय तरुणाचा धुमाकूळ
November 11, 2026