LIVE UPDATES

Maharashtra MD drug raid : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर कोट्यावधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त

'डी-कंपनी' कनेक्शन उघड : महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात ड्रग्ज नेटवर्कचे धागेदोरे
Edited by: Rajat Sawant
Published on: August 24, 2026 17:45 PM
views 366  views
Chandgad poultry farm drug raid

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांच्या ॲन्टी नार्कोटीक्स टास्क फोर्स, पुणेने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई केली आहे. या टास्क फोर्सने एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकत मेफेड्रोन तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १ कोटी १३ लाख ५१ हजार ४८० रुपयांचे २०८ ग्रॅम तयार एमडी ड्रग्ज, अतिघातक कच्चे रसायने आणि अद्ययावत उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. 

दरम्यान, या कारवाईमुळे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात खळबळ उडाली आहे. तसेच या ड्रग्ज माफियांचे धागेदोरे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीशी जोडले गेल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड पोलिस स्थानकाच्या परिसरात केलेल्या कारवाईत नयानगर येथील एका घरातून 2.64 कोटींचे 1.324 किलोग्राम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले होते. ड्रग्जच्या गुन्ह्याचा तपास करताना संशयित आरोपी इरफान सलीम खान याने पोलिसांना चंदगड येथे ड्रग्जची फॅक्टरी चालू असल्याची माहिती दिली होती. कोणाला शंका येऊ नये म्हणून विठ्ठल मालतवादर यांच्या पोल्ट्रीमध्ये ही फॅक्टरी चालवली जात होती. 

चंदगड तालुक्यातील हाजगोळी ते सरोळी या रस्त्यादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री शेतातील एका पोल्ट्री फार्मवर ॲन्टी नार्कोटीक्स टास्क फोर्सने टाकलेल्या छाप्यात स्थानिक चौघा तरुणासंह बेळगावचे दोघे ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी मत्तीन दफेदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष बसरीकट्टी व पप्पू मलतवाडकर यांना पथकाने तपासासठी ताब्यात घेतलेले आहे. पथकाने केलेल्या या कारवाईत एमडी, कच्चे रसायन, डिजिटल थर्मामीटर, टेस्ट ट्यूब, ओव्हन, मिक्सिंग मोटार आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.