LIVE UPDATES

कवी विठ्ठल कदम यांच्या 'फाळ' कवितासंग्रहाचे प्रकाशन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 24, 2026 19:08 PM
views 17  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : कवी विठ्ठल कदम लिखित आणि ग्लोबल बुक हाऊस प्रकाशित 'फाळ ' या कवितासंग्रहाचे प्रकाशन श्रीराम वाचन मंदिरातर्फे सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिका संध्या तांबे यांच्या हस्ते  करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून समीक्षक आणि कवी प्राचार्य गोविंद काजरेकर, ज्येष्ठ कवयित्री प्रा. शरयू आसोलकर, समीक्षक प्रा. संजीवनी पाटील यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक कादंबरीकार प्रवीण बांदेकर आणि श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष श्री. पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपली मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवयित्री स्नेहा कदम यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा‌. प्रवीण बांदेकर यांनी केले.