
सावंतवाडी : भजनप्रेमी आणि ग्रामस्थांच्यावतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित दर्शवली. यावेळी भजनप्रेमी, ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी सदस्यांशी त्यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमास उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, रविंद्र काजरेकर, आप्पा परब, सुनील परब, शाम गावडे, काशिनाथ कुंभार, प्रमोद गावडे, राजाराम धुरी, आनंद बुगडे, सुनील सावंत, चिंतामणी जाधव, रमेश परब, गजानन परब, बाळा जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.
यावेळी विशाल परब म्हणाले, “भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या गावची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि अध्यात्मिक परंपरेची ओळख होते. तळवडे ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा भक्तिमय उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. रामकृष्ण हरीच्या नामघोषाने आणि पारंपरिक भजनाच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध भजन मंडळांनी सहभाग घेत भक्तीमय वातावरण निर्माण केले. तळवडे ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि भक्तिभावाने पार पडलेल्या या महोत्सवामुळे गावातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक भक्तिमय झाले.










