
रत्नागिरी :रत्नागिरी शहरात पहाटेच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना घडली आहे.रत्नागिरीतील के. सी. जैन नगर परिसरातील महालक्ष्मी मिनी मॉलला पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण मिनी मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत महालक्ष्मी मिनी मॉल जळून खाक झाला आहे.
आगीचे मोठमोठे लोळ आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ ते ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, पाण्याच्या तुटवड्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले.
दरम्यान, या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे रत्नागिरी शहरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.पहाटेच्या या अग्नितांडवामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








