LIVE UPDATES

खासदार चषक बांदाचे विजेतेपद वेतोरे आडेली संघाने पटकावले

Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2026 14:13 PM
views 203  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खासदार चषक बांदाचे विजेतेपद समंध वेतोरे आडेली संघाने पटकावले असून विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडू, संघ मालकांचे भाजप युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब यांनी अभिनंदन केले आहे.


या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, नगरसेवक अजय गोंदावळे, सरपंच प्रियांका नाईक, जावेद खतीब, बाळू सावंत, मधुकर देसाई, गुरू सावंत, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.